डीआरडीओनं केली पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं क्षमतावृद्धी केलेल्या पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी केली. चंदिंगड इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावर स्वदेशी निर्मिती असलेल्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरद्वारे ही चाचणी केली गेली. क्षमतावृद्धी केल्यानंतर या रॉकेटचा मारा करण्याचा पल्ला ४५ किलोमीटरपर्यंत वाढला आहे. चाचणीच्या वेळी नवी सुधारित विविध अंतरावर २५ पिनाका रॉकेट्स डागली गेली, त्यावेळी या रॉकेट्सनं आपलं लक्ष्य अचूकपण गाठल्याची माहिती डीआरडीओनं दिली आहे. यावेळी १२२ मिलीमीटर कॅलीबर रॉकेटचीही यशस्वी चाचणी करण्यात आली. या कामगिरीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image