केंद्रीय निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाकडे केली अनेक सुधारणांची शिफारस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खुल्या आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, तसंच मतदानाची टक्केवारी आणखी वाढावी यादृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाकडे अनेक सुधारणांची शिफारस केली आहे. निवडणुकीतील उमेदवारांनी खोटी प्रतिज्ञापत्र सादर केल्यास त्यांची तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षापर्यंत वाढविण्यासारख्या इतर काही सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये दिली. बनावट निवडणूक ओळखपत्रांना प्रतिबंध करण्यासाठी ही ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करावीत, मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठीच्या तारखांमध्ये वाढ करावी, अशाही सुधारणा निवडणूक आयोगानं सुचवल्या आहेत.