देशात १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल ९२ हजार ५९६ नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या ६ हजारांनी जास्त आहे. देशात काल १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. या चोवीस तासात कोविड-१९ मुळे २ हजार २१९ जणांचा मृत्यु झाला. सध्या १२ लाख ३१ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९४ पूर्णांक २९ शतांश टक्के झालं तर उपचाराखालील रुग्णाचं प्रमाण साडे चार टक्क्यांवर आलं आहे. आजवर कोविड-१९ मुळे ३ लाख ५३ हजारांहून अधिक रुग्ण दगावले आहेत.