2024 पर्यंत रस्ते अपघातात 50 टक्क्यांनी घट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील रस्ते अपघातांमध्ये 2024 पर्यंत 50 टक्क्यांनी घट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितलं.

रस्ते अपघात टाळण्यात उद्योगांची भूमिका या विषयावर फिक्की या संघटनेनं आयोजित केलेल्या चर्चासत्रात गडकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. रस्ते सुरक्षेसाठी सफर हा गट स्थापन केल्याबद्दल आणि उद्योगजगतासाठी रस्ते सुरक्षा या मुद्द्यावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्याबद्दल गडकरी यांनी फिक्कीचं अभिनंदन केलं.