कोवॅक्सिन या लशीचं उत्पादन १० कोटी डोसपर्यंत करायचं - केंद्र सरकार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन या भारत बायोटेक निर्मित कोविड प्रतिबंधक लशीचं उत्पादन दरमहा दीड कोटीने वाढवून १० कोटी डोसपर्यंत करायचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ.वी.के. पॉल यांनी सांगितलं की, सार्वजनिक क्षेत्रातले आणखी ३ उपक्रम कोवॅक्सिनच्या उत्पादनात सहभागी होणार असून त्यामुळे दरमहा १३ कोटी डोसचं उत्पादन होईल. कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी आणखी खाजगी कंपन्यांनी पुढं यावं असं आवाहन पॉल यांनी केलं.