टोसिलुझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाबधितांवर उपचारासाठी वापरले जाणाऱ्या, अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक असलेल्या टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करताना नाशिकमधल्या गंगापूर रोड परिसरात चौघांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पकडले आहे.

त्यांच्याकडून एक टोसिलुझुमॅब इंजेक्शन तसच मोटार कार, मोबाईल असा चार लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.