भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय

 

भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. केंद्र सरकारनं एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेनं यावर निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता.

मात्र, भारताला हे निर्बंध लागू होणार नाहीत असा विश्वास होता. अमेरिकेतील भारतीय वंशाचे संसदपटू रो खन्ना यांनी अमेरिकेच्या संसदेत मांडलेल्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर तिथल्या संसदेनं  हा ठराव मंजूर केला. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेचे संरक्षण संबंध आणखी बळकट होतील असा अशी प्रतिक्रिया रो खन्ना यांनी दिली आहे.