मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ३७ लाख २३ हजारांहून अधिक नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासन, पालिका, क्लिनअप मार्शल तसंच पोलीसांनी ही कारवाई केली.