उत्पादन खर्च कमी करणारा नॅनो युरिया इफकोद्वारे निर्मित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफको कंपनीद्वारे पुढील महिन्यात नॅनो युरिया बाजारात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 500 मिलि नॅनो युरियाची किंमत 240 रुपये असून 45 किलो सामान्य युरियाच्या तो समतुल्य आहे. या पर्यावरणस्नेही युरियामुळे उत्पादन खर्च कमी होण्यासोबत उत्पादनात वाढ देखील होणार असल्याचं रसायन आणि खत मंत्री डीवी सदानंद गौडा यांनी सांगितलं. सामान्य युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाल्यास सबसिडी आणि परकीय चलनात देखील मोठी बचत होणार आहे.