गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात आज सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. सावरगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत मोरचूल जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान आज सकाळी ७ च्या सुमाराला नक्षलविरोधी अभियान राबवत असताना दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.

पोलिसांनी प्रत्युत्तर देताच ते जंगलातून पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image