पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान कोसळले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान काल रात्री पंजाबमधल्या मोगा इथं कोसळलं. यात वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यु झाला.

अपघात झाला त्यावेळी विमानाचा नियमित प्रशिक्षण सराव सुरू होता. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं हवाई दलानं ट्विटर संदेशाद्वारे कळवलं आहे.

स्क्वाड्रन लीडर चौधरी यांच्या मृत्युविषयी शोक व्यक्त करुन हवाई दल त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असंही या संदेशात म्हटलं आहे