देशात आत्तापर्यंत १७ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधंक लसीच्या १७ कोटी २७ लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल २५ लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तिसऱ्या टप्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटाल्या नागरिकांचही लसीकरण सुरु असून आतापर्यंत त्यांच्यापैकी २५ लाख ५९ हजारापेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालं आहे. काल या वयोगटातल्या ५ लाख २४ हजारापेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालं.