मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ पूर्णांक २ दशांश टक्के झालं आहे. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल ३४ हजार ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली.
राज्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ५३ लाख ४४ हजार६३ झाली आहे. काल ९६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ८० हजार ५१२ वर पोचली आहे.
सध्या राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ५१ शतांश टक्के आहे. आतापर्यंत तपासलेल्या ३ कोटी ८ लाख ३९ हजार ४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक ३३ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात काल ६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ६१८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात ९ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल या आजारामुळे ११ रुग्ण दगावले.
सांगली जिल्ह्यात काल १ हजार ५७३ रुग्णांनी या आजारावर मात केली. जिल्ह्यात काल १ हजार ६०१ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १६ हजार ९८५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल ४९ रुग्णांचा मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यात काल ३ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात काल १ हजार ८५१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला. जिल्ह्यात काली आजारामुळे ३० रुग्णांनी आपला प्राण गमावला.
बुलडाणा जिल्ह्यात काल बरे झालेल्या ७६४ रुग्णांना घरी पाठवलं. जिल्ह्यात काल ८७८ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८३८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात काल या आजाराने ७ रुग्णांचा बळी घेतला.
सोलापुर जिल्ह्यात काल २ हजार २४० रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात काल १ हजार ९५९ रुग्णांना या आजाराची लागण झाली. सध्या जिल्ह्यात १६ हजार २४७ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात काल ४२ रुग्ण दगावले.
वाशिम जिल्ह्यात काल ४९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात काल ५७८ बाधित रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ४ हजार ६०१ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल १० रुग्णांचा मृत्यू झाला.
यवतमाळ जिल्ह्यात काल ९९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ५२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात ५ हजार ३०१ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात काल २० रुग्णांनी आपला प्राण गमावला.
नांदेड जिल्ह्यात काल बरे झालेल्या ६५८ रुग्णांना घरी पाठवलं. जिल्ह्यात काल २७३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात काल या आजारानं ९ रुग्णांचा बळी घेतला. सध्या जिल्ह्यात ३ हजार ४२६ रुग्ण उपचाराधीन आहेत.
परभणी जिल्ह्यात काल ८४४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात काल ५६३ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यात काल १५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ३ हजार ५७८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात काल ९०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात काल ३०४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला. काल जिल्ह्यात १३ रुग्ण दगावले. सध्या जिल्ह्यात ५ हजार ३९० रुग्ण उपचार घेत आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.