देशात सोमवारी ४ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सोमवारी एकाच दिवसात ४ लाख २२ हजारापेक्ष जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आत्तापर्यंत देशभरातले एकूण २ कोटी १५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच देशाचा कोरोनामुक्तीचा दर वाढून ८५ पुर्णांक ६० शतांश टक्के झाला आहे. देशात  सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी ३ लाखापेक्षा कमी २ लाख ६३ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर ४ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ७१९ झाली आहे. सध्या देशभरात ३३ लाख ५३ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.