राष्ट्रीय जलविद्युत निर्मिती प्राधिकरणाने केली लसीकरणाची मोहीम सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय जलविद्युत निर्मिती प्राधिकरणाने कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची मोठी मोहीम सुरू केली असून त्यामध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इतर संस्था आणि सार्वजनिक उपक्रम यामधील कर्मचाऱ्यांना प्राधान्यांनं लसीची मात्रा देण्यात येणार आहे.

सध्याच्या आपत्तीजन्य परिस्थितीत देशातील वीजपुरवठा २४ तास अखंडितपणे सुरू ठेवण्याचं मोठं आव्हान मंत्रालयापुढे आणि पर्यायानं कर्मचार्यांसमोर आहे. काल दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून याचं पहिला टप्पा पार पडला. ११७ कर्मचाऱ्यांना कोव्हीशिल्ड लसीची मात्रा देण्यात आली.