मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद राहणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रशासनानं ही माहिती दिली. दोन दिवस लसीकरण बंद असल्यानं, पुढची माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

दरम्यान आत्तापर्यंत मुंबईतल्या २८ लाख १७ हजार ४२५ नागरिकांना कोविड१९ प्रतिबंधक लस दिली असल्याचं पालिकेच्या आरोग्य प्रशासनानं कळवलं आहे.