सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार संजय मंडलिक, काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव, आ.ऋतुराज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात आज आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी घोषणा देत मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात निदर्शने केली.

पक्षीय मतभेद बाजूला सारून आजी-माजी खासदार-आमदार- मंत्री आदींनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.