महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र उभारण्यासाठी क्रीडा मंत्रालयाची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रीडा मंत्रालयानं देशातल्या महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र, मिझोरम, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, अरूणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.