राज्यात शुक्रवारी ५४ हजार २२ नव्या कोविड रूग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३७ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५ पूर्णांक ३६ शतांश टक्के झाले आहे.

राज्यात सध्या ६ लाख ५४ हजार ७८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल ५४ हजार २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ४९ लाख ९६ हजार ७५८ वर पोचली आहे. काल ८९८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या  ७४ हजार ४१३ झाली आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ४९ शतांश टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत तपासलेल्या २ कोटी ८९ लाख ३० हजार ५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक २७ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काल ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ६६२ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात काल १९, तर आतापर्यंत ७७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात काल १ हजार १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात काल २ हजार ४६ नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १६ हजार ७३४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल या आजारानं ४५ रुग्णांचा बळी घेतला.

बुलडाणा जिल्ह्यात काल बरे झालेल्या १ हजार ९६ रुग्णांना घरी पाठवलं. काल जिल्ह्यात १ हजार १०३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या जिल्ह्यात ५ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल ११ रुग्ण दगावले.

अहमदनगर जिल्ह्यात काल ३ हजार ८५६ रुग्णांनी कोरोना वर मात केली जिल्ह्यात काल ४ हजार ५९४ नवीन रुग्णांची भर पडली सध्या जिल्ह्यात २७ हजार ९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

परभणी जिल्ह्यात काल ६८४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात काल ६२० रुग्णांना या आजाराची लागण झाली. सध्या जिल्ह्यात ७ हजार ७६३ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात काल या आजारामुळे २३ रुग्णांनी आपला प्राण गमावला.

हिंगोली जिल्ह्यात काल १९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल १३२ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ९४० रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल ६ रुग्णांचा मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ६४२ रुग्णांनी या आजारावर मात केली. काल जिल्ह्यात १ हजार ४४९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या १५ हजार ८८२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल २३ रुग्ण दगावले.

नांदेड जिल्ह्यात काल १ हजार ६३ या आजारातून बरे झाले जिल्ह्यात काल ५६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात ६ हजार २५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल १५ रुग्णांनी आपला प्राण गमावला.