भारतीय भाषा शिकण्यासाठी अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर- केंद्रसरकार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्रसरकारने भारतीय भाषा शिकण्यासाठीचं अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर केली आहे. भारतीय संस्कृतीच्या विविधतेत सुसंवाद घडवून आणण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या धोरणानुसार हा उपक्रम MyGov या मंचावर घेण्यात येणार आहे.

भारतीय नागरिक, लघुउद्योजक आणि कंपन्या या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. प्रवेश नोंदवण्याची अंतिम तारीख आहे २७ मे. तज्ञांनी ठरवलेल्या निकषांनुसार १० चमूंना सादरीकरणाची संधी मिळेल. त्यातल्या सर्वोत्कृष्ट ३ स्पर्धकांना आपापली अॅप आणखी चांगली बनवण्यासाठी सरकारकडून अनुक्रमे २० लाख, १० लाख आणि ५ लाख रुपयांचा निधी मिळेल.