कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.चाचण्या वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावं, या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला आहे.आयात शुल्कातील ही सूट या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत असेल.