देशात काल ३ लाख ११ हजार १७० नव्या कोविड रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३ लाख ११ हजार १७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, ३ लाख ६२ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर ४ हजार ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ कोटी ७ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्तीचा दर ८४ पूर्णांक २५ शतांश टक्के झाला.

सध्या देशभरात ३६ लाख १८ हजारापेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्याच्या एकूण संख्येचे तुलनेत १४ पूर्णांक ६६ शतांश टक्के आहे. देशात आतापर्यंत या आजारानं २ लाख ७० हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.