कांगो प्रजासत्ताकात माऊंट नायीरागोंगोवरील ज्वालामुखी सक्रिय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगो देशातील न्यीरागोंगो पर्वतावर शनिवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यातून निर्माण झालेला ज्वालामुखीचा प्रवाह २ लाख वस्ती असलेल्या गोमा नावाच्या शहरापर्यंत पोहोचला आहे. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतू ज्वालामुखीचा सर्वात जास्त परिणाम झालेल्या भागामधून हा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच १७० हून अधिक मुले तसेच १५० इतर नागरिक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. गोमा शहराच्या बाह्य भागापर्यंत येऊन पोहोचलेल्या लाव्हारसाचा प्रवाहात शेकडो घरं, इमारती गाडल्या गेल्या आहेत.