देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ३ लाख ५७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, २ लाख ५९ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण २ कोटी २७ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच देशातला कोरोना मुक्तीदर वाढून ८७ पुर्णांक २५ शतांश टक्क्यावर पोचला आहे.

देशभरातल्या उपचाराधीन कोरोनाबाधितांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली असून, सध्या देशभरात ३० लाख २७ हजारापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात कालच्या दिवसभरात ४ हजार २०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या २ लाख ९१ हजार ३३१ झाली आहे.