सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पा विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीमधील अडसर आता दूर झाला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देऊन त्याचं बांधकाम थांबवावं, अशी मागणी करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती आज सकाळी न्यायालयानं फेटाळली आणि याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड केला. काम सुरु ठेवण्याचे आदेशही न्यायालयानं सरकारला दिले आहेत.