पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल- संयुक्त राष्ट्र

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभाव्य शक्यता याबाबतच्या यावर्षाच्या सुधारित अहवालात भारतीय अर्थव्यवस्था २०२२ मध्ये १० पूर्णांक १ दशांश टक्क्यानी वाढेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर, चीनच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग कमी होऊन ५ पूर्णांक ८ दशांश टक्के होईल, असं या अहवालात म्हटलं आहे. २०२१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७ पूर्णांक ५ दशांश टक्के असेल, असंही या अहवालात नमूद केलं आहे.