केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल यांना या वर्षीचं आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांना या वर्षीचं आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. महर्षि संघटनेचे जागतिक अध्यक्ष डॉ टोनी नाडर यांनी म्हटलं आहे की, डॉक्टर निशंक यांना लेखन तसंच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाच्या माध्यमातून मानवतेसाठी त्यांच्या कटिबद्धतेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. तसचं केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण निर्मितीत त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी निशंक यांची निवड करण्यात आली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.