राज्यात तिसरी ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीन नागपूरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ओडिशा इथल्या अंगुल इथून ऑक्सीजन घेऊन आलेली ही रेल्वेगाडी काल मध्यरात्री नागपूरला पोहोचली. या रेल्वेमध्ये ५६ पूर्णांक ३ शतांश मेट्रिक टन ऑक्सीजन असून त्याचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे. गेल्या महिन्यात दोन ऑक्सीजन एक्सप्रेस रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून ऑक्सीजन प्राप्त झाला होता.