वस्तू आणि सेवा कर परिषदेची 43वी बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर परिषदेची 43वी बैठक उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. यापूर्वीची म्हणजे 42वी बैठक गेल्या 5 ऑक्टोबरला झाली होती.