सहा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या नवा विषाणुचा शिरकाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्लीतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.

प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणाऱ्या प्रवाशांनाच महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर उतरता येईल, असं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. या सहा राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी करावी, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घ्यावी, अशा सूचना त्यात दिल्या आहेत. तसंच, चाचणी निगेटिव्ह असली तरी या प्रवाशांना १५ दिवसांचं गृह विलगीकरण बंधनकारक आहे. तसे शिक्के प्रवाशांच्या हातावर मारण्याच्या सूचना या आदेशात  दिल्या आहेत.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image