विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती.

या आगीत रुग्णालयातील १७ रुग्ण अडकले होते. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.