सर्व हॉटेलांप्रमाणेच आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात त्याच दरात मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या संदर्भातला आदेश अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी जारी केला आहे. इतर सर्व हॉटेलांप्रमाणेच आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले.