येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.