मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तसंच राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली.

खासगी रुग्णालयात शनिवार ते सोमवार लसिकरण होणार नाही, मात्र लसींचा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण केले जाईल असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहेत.

लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. मात्र लसींचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.