१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितले. यासाठी ६ लाख ५०० कोटी रुपये खर्च येणार असून येत्या ६ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र लशींची संख्या कमी असल्यामुळे १ मे पासून सरसकट लसीकरण होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोविन अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊन १ मे नंतरही वाढण्याची शक्यता असून लॉकडाऊन ७ किंवा १५ दिवसाचा करायचा ? याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.