रेल्वेच्या गाड्या नेहमीप्रमाणे चालूच राहणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बुधवारी रात्रीपासून सुरु झालेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकमान्य टिळक स्थानकाबाहेर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकांची गर्दी दिसून आली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि शासकिय रेल्वे पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करावी लागली.

रेल्वेच्या गाड्या नेहमीप्रमाणे चालूच राहणार असून गरजेनुसार अतिरिक्त गाड्याही सोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये आणि स्थानकांमधे गर्दी करु नये, असं आवाहन मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

कन्फॉर्म टिकट असणाऱ्या प्रवाशांना गाडीत बसण्याची परवानगी दिली जाईल. त्यांनी गाडी सुटण्याच्या वेळेच्या फक्त दीड तास आधी स्थानकावर यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image