हनुमान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा - गृह मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या मंगळवारी असलेला हनुमान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा असं आवाहन गृह मंत्रालयानं केलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे सर्व धार्मिक स्थळे तसंच मंदिर, पूजा तसेच दर्शनासाठी बंद ठेवली आहेत. 

मंदिराच्या व्यवस्थापनांनी शक्य असल्यास स्थानिक केबल यंत्रणा, वेबसाईट तसंच फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावं असंही सांगितलं आहे.

हनुमान जयंतीनिमित्त प्रभात फेरी तसंच मिरवणुका काढण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत. याबाबत आखून दिलेल्या नियमांचे कठोरपणे पालन केलं जावं असं आवाहन शासनानं केला आहे.