कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळावे असे कोकण रेल्वेचे आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासादरम्यान विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये सध्या आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात असून प्रवाशांना मास्कच्या वापराबरोबरच कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळायचं आवाहन कोकण रेल्वेनं केलं आहे.