१ मे पासून १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरण मोहिम सुरु करणे शक्य नाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरण मोहिम सुरु करणं शक्य नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. राज्य सरकारनं यासंदर्भात १२ कोटी लशींच्या पुरवठ्याबाबत लसनिर्मिती कंपन्यांशी विचारणा केली होती, मात्र या कंपन्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. राज्यात १८ ते ४५ वयोगटात ५ कोटीहून अधिक नागरिकांचा सहभाग आहे, असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात केंद्रसरकारनं लक्ष घालावं, अशी मागणी राज्यानं केली आहे. दरम्यान, १८ ते ४५ वयोगटातल्या नागरिकांनी आरोग्य सेतू किंवा कोविन अॅपद्वारे नावं नोंदणी करावी, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image