कोरोना प्रतिबंधाचा काळातही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधाचा काळ असतानाही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला आहे. गेल्या वर्षी 1हजार 205 दशलक्ष टन एवढ्या मालवाहतूकीच्या तुलनेत काल संपलेल्या आर्थिक वर्षांत 1 हजार 224 दशलक्ष टन एवढी मालवाहतूक करण्यात आली. यातून रेल्वेला 1 लाख 16 हजार 634 कोटी रुपये  एवढी कमाई झाली आहे. गेल्या वर्षी ही कमाई 1 लाख 13 हजार 477 एवढी होती. गेल्या महिन्यात मालवाहतूक 122 पुर्णांक 19 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली.