मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचं आज सकाळी सात वाजता निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या आठवडाभरापासून ते आजारी होते. सातपूर इथं खासगी रुग्णालयात  त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि माकपच्या जेष्ठ नेत्या मनीषा, मुलगा हेमंत, सून अश्विनी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. 

देशपांडे यांच्या पार्थिवावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशकं भरीव कार्य केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तसंच सिटू संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शेतकरी आणि कामगार यांच्या तसंच इतर पुरोगामी चळवळीबाबत ते वृत्तपत्रात सातत्यानं लिखाण करत असत.