नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील आग आटोक्यात - तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल अज्ञात इसमानं लावलेली आग आटोक्यात आणताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी झाले आहेत.

मृत मजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे.

या वनात आग लागल्याचं दिसताच जवळपास ५० ते ६० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर ती आग विझवण्याचं काम करत होते.

सायंकाळी ५ वाजता आग आटोक्यात आलीही परंतू वाऱ्याने पुन्हा अंगार पेटला आणि तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला. आगीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.