पुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

पुणे : पुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 इतका रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करणेत आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

21 एप्रिल 2021 अखेर 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स व्हायल्स पुणे जिल्हयात वितरीत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स व्हायल्स दिनांक 20 एप्रिल व 21 एप्रिल 2021 रोजी या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सीजन बेडच्या संख्येनुसार 8 हजार 100 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हाईल या पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोमेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरीत करण्यात आल्या आहेत. संबंधित कोविड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय,वाजवी दरात करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.

पुणे जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दिनांक 11 एप्रिलपासून २४ X ७ रेमडिसिव्हीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडिसिव्हीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांचे मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडिसिव्हीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्याचसोबतच पुणे, पिंपरी महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, पुणे ग्रामीण, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

दररोज प्राप्त झालेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे रूग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी नागरीकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणेच्या pune.gov.in व https://.pune.gov.in/corona-virus-updates/. या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.


Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image