राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज

 

मुंबई (वृत्तसंस्था) : 45 वर्षावरील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर आता राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज असल्याचं राज्य लसीकरण कार्यालयाकडून केंद्र सरकारला कळवण्यात आलं आहे. राज्यातील  लसीकरणाची क्षमत दररोज किमान अडीच लाखांपासून पाच लाखापर्यंत वाढवली जाणार आहे, त्यातुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास संपूर्ण नियोजन कोलमडून पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.