दिल्ली विधानसभेमध्ये मंजुरी मिळालेला कोणताही कायदा लागू करण्याचा अधिकार नायब राज्यपालांना देणारं विधेयक संसदेत मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार सुधारणा विधेयक काल संसदेमध्ये मंजूर झालं. काल या विधेयकाला राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली. अधिनियम १९९१ मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या या विधेयकाला गेल्या सोमवारी लोकसभेमध्ये मंजुरी मिळाली होती. या सुधारित विधेयकानुसार, दिल्ली विधानसभेमध्ये मंजुरी मिळालेला कोणताही कायदा लागू करण्याचा अधिकार आता नायब राज्यपालांना असणार आहे.

या विधेयकाद्वारे दिल्लीच्या नायब राज्यपालांना वाढीव अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील परस्पर संबंध अधिक मजबूत आणि स्नेहपूर्ण करण्याचा हेतू आहे, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सदनामध्ये हे विधेयक मांडताना सांगितलं. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेमध्ये ८३ विरुद्ध ४५ मतांनी मंजूर झालं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image