ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

  ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानं अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारं दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आणि चतुरस्त्र अभिनयामुळे ते कायम रसिकांच्या स्मरणात राहतील‌‌.

श्रीकांत मोघे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.