टोल वसुली कथित गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं कॅगला दिले निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर टोल वसुली दरम्यान होत असलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं कॅगला दिले आहेत. यासंबंधात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. ऑगस्ट २०१९ पासून एक्सप्रेसवे वर होत असलेली टोल वसुली अवैध असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.