जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार डॉ. बी बी गायतोंडे यांच निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रतिथयश डॉक्टर भिकाजी बळवंत उर्फ बी बी गायतोंडे यांच काल मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमाराला बांदा इथं राहत्या घरी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते.

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बांदा इथंच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. गायतोंडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य रुग्णसेवा, जनसेवा आणि शैक्षणिक कार्यासाठी व्यतीत केल.

ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाची स्थापना केली.