महाराष्ट्रात आजपासून १५ एप्रिलपर्यंत जमावबंदी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात यापूर्वी लागू केलेले सर्व निर्बंध १५ एप्रिलपर्यंत पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, आदी सर्व आदेश पाळावे लागतील.

कार्यालयात यापूर्वी लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल. कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. पाचपेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश २७ मार्च २०२१ पासून लागू करण्यात आलेला असून तो १५ एप्रिलपर्यंत अंमलात असेल. याचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image