लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार महिने हिवाळ्यासाठी बंद राहिलेला लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. “लेह - मनाली, लडाख प्रदेश देशाशी जोडला जाईल. चार उंच खिंडी, ४२८ किलोमीटरचा रस्ता दळवळणासाठी सीमा रस्ता संघटनेच्या हिमांक आणि दीपक प्रकल्पांच्या अभियंत्यांकरिता आणि कामगारांच्या दृष्टीने चालविणे नेहमीच एक आव्हानात्मक राहिलं आहे.

पूर्व लडाख भागातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेवून हा मार्ग डिसेंबरपर्यंत खुला ठेवण्यात आला होता. सर्वाधिक हिमवर्षाव असणारा टैगलांग ला खिंड संपूर्ण हिवाळ्यामध्ये खुली  ठेवण्यात आली होती. गोठवून टाकणाऱ्या तापमानात सीमा रस्ते संघटनेनं नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे दोन महिने अगोदर लेह मनाली मार्ग खुला करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image